चामोर्शीत ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरी; मुस्लिम बांधवांचा भव्य जुलूस.
Oplus_131072
चामोर्शी, दि. २७ : हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त चामोर्शी शहरात ईद मिलादुन्नबी उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. जामा मस्जिद कब्रस्तान कमिटीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लतीफ खान यांच्या हस्ते ध्वजारोहण (परचम कुशाई) करण्यात आले. त्यानंतर मिलाद शरीफ तसेच कुरआन पठणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी हाफिज मो. मन्सूर आलम यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करत त्यांच्या विचारांचा आणि मानवतेच्या संदेशाचा परिचय उपस्थितांना करून दिला.
ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या वतीने चामोर्शी शहरातून जुलूस काढण्यात आला. जुलूसमध्ये समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जामा मस्जिद कमिटीचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
