आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची शासकीय वसतिगृहांना भेट; सात दिवसांत आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन.

0
file_0000000061bc8211b46f122e4f28feb8
Spread the love

गडचिरोली, दि. २६ ऑगस्ट : शहरातील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह क्र. १ व २ येथे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी बुधवारी सायंकाळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत शैक्षणिक सुविधा, वसतिगृहातील व्यवस्था आणि दैनंदिन समस्यांचा आढावा घेतला.
भेटीदरम्यान आमदार नरोटे यांनी वाचनालय, संगणक कक्ष तसेच वसतिगृह परिसराची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी वाचनालयात स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तकांची कमतरता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. याची तत्काळ दखल घेत येत्या सात दिवसांत आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
MPSC, UPSC, JEE, NEET आणि MHT-CET यांसारख्या स्पर्धा व प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य, मार्गदर्शन आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे डॉ. नरोटे यांनी सांगितले.
वसतिगृहातील अन्य समस्या संबंधित विभाग व प्रशासनाच्या समन्वयातून प्राधान्याने सोडविण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आमदारांनी प्रत्यक्ष वसतिगृहात येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
“गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी करण्यासाठी योग्य वातावरण व आवश्यक सुविधा मिळणे ही आपली प्राथमिकता आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल,” असे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी सुरजजी पोटावी, संकेतजी कुनघाडकर, वसतिगृह क्र. १ चे अधीक्षक विश्वजीतजी काळे, वसतिगृह क्र. २ चे अधीक्षक योगेशजी फुसे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!