नव्या शिक्षणाधिकाऱ्यांचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे उत्स्फूर्त स्वागत.

0
IMG-20260826-WA0012
Spread the love

 

गडचिरोली : कास्ट्राईब शिक्षक संघटना, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्हा परिषद येथे नव्याने रुजू झालेले प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. प्रेरक उजगारे  तसेच उपशिक्षणाधिकारी मा. संजीव पार्सेवार  यांचे सन्मानपूर्वक स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा. ओमप्रकाश साखरे, कार्याध्यक्ष मा. दिलीप मेश्राम, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. चक्रपाणी कन्नाके, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष मा. गंगाधर मडावी, कोषाध्यक्ष मा. प्रभाकर साखरे, कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका चामोर्शीचे अध्यक्ष मा. मोरेश्वर भैसारे, संघटनेचे मार्गदर्शक मा. कपिल सहारे तसेच राहुल खोब्रागडे, सुधा खोब्रागडे, निखिल उईके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नव्याने रुजू झालेल्या शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या, शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी, दुर्गम व अतिदुर्गम भागातील शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
गडचिरोली हा आदिवासीबहुल, दुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने येथील शिक्षक व शिक्षण व्यवस्थेसमोर अनेक विशेष आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, शिक्षकांच्या अडचणींना सकारात्मक प्रतिसाद मिळावा आणि शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम व्हावी, यासाठी प्रशासन व शिक्षक संघटनांमध्ये सकारात्मक समन्वय आवश्यक असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
कास्ट्राईब शिक्षक संघटना ही शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसोबतच जिल्ह्यातील शैक्षणिक विकासासाठीही सातत्याने सकारात्मक भूमिका बजावत असून, शिक्षक व प्रशासन यांच्यात समन्वय साधत शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सदैव प्रयत्नशील राहील, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
नव्याने पदभार स्वीकारलेल्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. प्रेरक उजगारे साहेब व उपशिक्षणाधिकारी मा. संजीव पार्सेवार साहेब यांना त्यांच्या पुढील प्रशासकीय कार्यकाळासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!