स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे कुरखेडा पोलीसांची अवैध गोवंश वाहतुक करण्याऱ्यावर कठोर कारवाई.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

                         प्रेस नोट

 

01 ट्रक, 01 चारचाकी वाहन व 19 गोवंशीय जनावरांसह एकूण 19,65,000/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

गडचिरोली-दिनांक- 25/08/2026

गडचिरोली जिल्ह्रातील काही असामाजीक घटकांकडून अवैध कारवाया करण्याचा प्रयत्न केला जात असतो. पोलीस अधीक्षक  एम रमेश यांच्याकडून इतर अवैध व्यवसायांसोबतच अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक व विक्री करणा­यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरुन काल दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने पोस्टे कुरखेडा हद्दीतील मौजा गेवर्धा गावाजवळील परिसरामध्ये अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणा­या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केलेली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, काल दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी रात्रीच्या सुमारास पोस्टे कुरखेडा हद्दीतील मौजा गेवर्धा ते केशोरी मार्गावर ट्रक आणि महिंद्रा बोलेरा अशा दोन चारचाकी वाहनांमध्ये अवैधरित्या गोवंशीय जनावरे भरुन वाहतूक करण्यात येणार आह, अशी गोपनीय स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळालेली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे कुरखेडा पोलीस पथकांनी मौजा गेवर्धा गावाजवळ सापळा रचुन पाळत ठेवली असता, मौजा गेवर्धा ते केशोरी रोडवर ट्रक आणि बोलेरो पिकअप अशी दोन वाहने संशयीतरित्या येतांना दिसुन आली. त्यावेळेस पोलीस पथकांनी सदर रोडवर तात्पुरता अडथळा निर्माण करुन दोन्ही वाहनांना थांबवून सदर वाहनांची पाहणी केली असता, दोन्ही वाहनांमध्ये गोवंशीय जनावरे अतिशय निर्दयतेने कोंबुन भरले असल्याचे निदर्शनास आले. सदर अवैध गोवंशीय जनावारांच्या वाहतूकीचा आरोपींकडे कुठलाही परवाना देखील मिळून आला नाही.
यानंतर पोलीस पथकाने पंचांसमक्ष सदर दोन्ही वाहनांची तपासणी केली असता, ट्रक वाहन क्रमांक 1) टीजी 12 यु 4896 अशोक लेलँड टाटा कंपनीची ज्याचा चालक नामे शेख ईब्रााहिम शेख इस्माईल, वय 40 वर्षे, रा. मेहबुब नगर पिली नदी, उप्पलवाडी, नागपूर, जि. नागपूर यांचे ताब्यातील वाहनात 11 गाय व 02 बैल, एकूण किंमत 1,85,000/- त्याचप्रमाणे वाहन क्रमांक 2) एम एच 35 ए. जे. 4601 महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन ज्याचा चालक नामे मुफस्सील कुरेशी मोहम्मद जमील कुरेशी, वय 25 वर्षे, रा. चिराग अली चौक टेका नई बस्ती, नागपूर, जि. नागपूर याचे ताब्यातील वाहनात 04 गाय व 02 बैल एकूण किंमत अंदाजे 80,000/- रुपये असे एकूण दोन्ही चारचाकी वाहनात 19 गोवंशीय जनावरे ज्यांची एकूण किंमत 2,65,000/- रुपये, यासोबतच 01 ट्रक अंदाजे किंमत 12,00,000/- रुपये व 01 महिंद्रा बोलेरो पिकअप चारचाकी वाहन अंदाजे किंमत 5,00,000/- रुपये असा एकूण 19,65,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यावरुन आरोपी नामे 1) शेख ईब्रााहिम शेख इस्माईल, वय 40 वर्षे, रा. मेहबुब नगर पिली नदी, उप्पलवाडी, नागपूर, जि. नागपूर व 2) मुफस्सील कुरेशी मोहम्मद जमील कुरेशी, वय 25 वर्षे, रा. चिराग अली चौक टेका नई बस्ती, डॉ. आंबेडकर मार्ग स.ओ. नागपूर, जि. नागपूर यांच्यावर पोलीस स्टेशन, कुरखेडा येथे अप. क्र. 191/2026 कलम 11 (1) (अ),11 (1) (ड), 11 (1) (इ), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 सहकलम 5 (अ), 5(ब), 9 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 सहकलम 3 (5) भा.न्या.सं. 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज. जी, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. श्री. अरुण फेगडे व पोस्टे कुरखेडाचे पोनि. अजय जगताप यांचे नेतृत्वात स्थागुशाचे पोउपनि. विश्वंबर कराळे, पोअं/तुषार खोब्राागडे, चापोअं/गणेश तसेच पोस्टे कुरखेडाचे परि.पोउपनि. कुणाल रेगुलवार, पोहवा/अजीतकुमार सुरजुसे, नापोअं/अमोल आलाम यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!