गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाच्या टप्पा क्रमांक २ साठी ₹८० कोटी १२ लाखांची मंजुरी मिळवून दिल्या बद्दल आ. डॉ मिलिंद नरोटे यांचे जाहीर. आभार !
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; गडचिरोलीच्या क्रीडा विकासाला प्रथमच मिळणार अत्याधुनिक सुविधांचे बळ!
डॉ. प्रणय खुणे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, जिल्हा गडचिरोली.
दिनांक 19 ऑगस्ट 2026 गडचिरोली.
गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंना अत्याधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तवा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वाखाली दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुलाच्या टप्पा क्रमांक २ मधील विविध क्रीडा व पायाभूत सुविधांच्या कामांना प्रत्यक्ष मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पासाठी ₹८० कोटी १२ लाखांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.
या टप्प्यात ४०० मीटर सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक, आधुनिक स्विमिंग पूल, खेळाडूंसाठी हॉस्टेल, आधुनिक क्रीडा साहित्य व स्पोर्ट्स इक्विपमेंट्स, प्रेक्षकांसाठी गॅलरी, कंपाउंड वॉल तसेच विविध अत्याधुनिक क्रीडा व पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
या प्रकल्पाच्या मान्यतेसाठी सातत्याने पाठपुरावा करत असताना क्रीडा विभागाचे सचिव श्री. रणजितसिंह देओल यांच्या दालनात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुलाच्या टप्पा क्रमांक २ संदर्भातील प्रस्ताव, आवश्यक क्रीडा सुविधा आणि प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत प्रकल्पाला गती देण्यासाठी आमदार नरोटे यांनी सातत्याने प्रयत्न केले,
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन क्रीडामंत्री दिवंगत अजितदादा पवारसाहेब तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्याकडेही या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला .
या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रकल्पाला गती देऊन आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण मंजुरी मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार!
जिल्ह्यातील या अत्याधुनिक क्रीडा संकुलामुळे गडचिरोलीतील खेळाडूंना सराव, प्रशिक्षण आणि विविध स्पर्धांसाठी आवश्यक दर्जेदार सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहेत. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील प्रतिभावान खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळून गडचिरोलीतून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्यास निश्चितच मदत होणार आहे.
क्रीडा विकास म्हणजे युवा शक्तीचा विकास आणि युवा शक्तीचा विकास म्हणजे गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्याचा विकास!
गडचिरोलीच्या खेळाडूंच्या स्वप्नांना आता अत्याधुनिक खरे सुविधांचे बळ मिळणार आहे!
क्रीडा विकास म्हणजे • युवा शक्तीचा विकास • गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असलेले धडाडीचे युवा आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांचे समस्त गडचिरोली विधानसभा मतदार संघांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने जाहीर आभार.
डॉ.प्रणय खुणे. जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी.
