शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.
Oplus_131072
चामोर्शी : शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रीय अभिमानाच्या वातावरणात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. डी. एन. चापले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य डी. आर. चौधरी ,क्रीडा शिक्षक राकेश खेवले तसेच उपप्राचार्य एस. एम. भर्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक व शाळेचे हितचिंतक नितेश गट्टीवार, सुभाषजी करणे, श्रावणजी सोनटक्के, नंदाजी चलाख, वरवाडे जी, वनकर भाऊ, भास्करजी चौधरी, मोते मॅडम, पतंगे मॅडम, हेमलता रायपुरे, अनिल भांडेकर, कोटांगले जी, उराडे जी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेतील सेवानिवृत्त कर्मचारी आर. के. बारसागडे सर, पी. जी. गोंगले, चिंतलवार सर, पी. जी. दुबे, इंगोले बाबूजी, वडेट्टीवार बाबूजी, किरमिरे बाबूजी, जी. वाय. कोल्हाटवार, आकुलवार सर, व्ही. जी. कोमेरवार, ए. व्ही. आक्केवार आणि एन. जे. कोठारे यांचीही उपस्थिती लाभली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत व पथसंचालन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी कराटेचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य जपण्याचे, देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवण्याचे आणि जबाबदार नागरिक म्हणून राष्ट्राच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.
देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
