चामोर्शी पोलीस स्टेशन मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात; पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

चामोर्शी : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन चामोर्शी पोलीस स्टेशन ला उत्साहपूर्ण आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी सामूहिक राष्ट्रगीताने परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.

स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे तसेच देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांचे स्मरण करण्यात आले. देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमात सहभाग घेत स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा केला. राष्ट्रध्वजाचा सन्मान, शिस्त आणि देशभक्तीच्या वातावरणात हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!