युवा संकल्प बहुउद्देशीय संस्थेला जिल्हा युवा संस्था पुरस्कार जाहीर; राहुल वैरागडे यांचे कार्य गौरवास्पद.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

ग्रामीण विकास व युवक कल्याणासाठी उल्लेखनीय योगदानाची शासनाकडून दखल

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘गडचिरोली जिल्हा युवा संस्था पुरस्कार (२०२५-२६)’ कु. राहुल वैरागडे यांच्या युवा संकल्प बहुउद्देशीय संस्था, भेंडाळा यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल राहुल वैरागडे आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासोबतच युवक कल्याणासाठी युवा संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक व विधायक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. वृक्षारोपण, युवकांना मार्गदर्शन, सामाजिक उपक्रम तसेच ग्रामस्थांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे संस्थेने ग्रामीण भागात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

राहुल वैरागडे यांच्या नेतृत्वाखाली युवकांना सामाजिक कार्याशी जोडण्यासोबतच गावाच्या विकासासाठी विविध उपक्रमांना चालना देण्यात आली. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि नि:स्वार्थ सामाजिक कार्याची शासनाने घेतलेली दखल ही संस्थेच्या कार्याचा गौरव मानली जात आहे.

हा पुरस्कार ग्रामीण भागातील युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी असून, सामाजिक बांधिलकी जपत विधायक कार्य करण्यासाठी नव्या पिढीला प्रोत्साहन मिळणार आहे. राहुल वैरागडे यांच्या नेतृत्वाखाली युवा संकल्प बहुउद्देशीय संस्थेने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!