विकसित गडचिरोलीच्या दिशेने मोठे पाऊल; ‘व्हिजन 2047’साठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन-विनीत डॉ.देवराव होळी.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

वनसंपदा, शेती, शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा आणि युवाशक्तीवर होणार मंथन; जिल्ह्याच्या विकासाचा कृती आराखडा तयार करण्याचा संकल्प

 

गडचिरोली, दि. १४ ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला नवी दिशा देण्यासाठी ‘चला गडचिरोली—जिल्हा घडवूया’ या संकल्पनेअंतर्गत ‘विकसित गडचिरोली व्हिजन 2047’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आर. के. सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथे ही कार्यशाळा होणार आहे.

भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत गडचिरोलीच्या भविष्यातील विकासाचा व्यापक आराखडा तयार करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मुद्द्यांवर चर्चा आणि विचारमंथन होणार आहे.

वनसंपदा, शेती, शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा आणि युवाशक्ती या सहा प्रमुख क्षेत्रांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. वनसंपदा संवर्धनासोबत रोजगारनिर्मिती, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीचा विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, नवीन उद्योग व रोजगाराच्या संधी, मजबूत पायाभूत सुविधा तसेच युवा वर्गाच्या कल्पना व सहभागातून गडचिरोलीला पुढे नेण्याचा संकल्प या उपक्रमातून मांडण्यात आला आहे.

‘जिल्हा वाचूया, एकत्र येऊया… चर्चा करूया… योजना बनवूया आणि भविष्य घडवूया!’ या भूमिकेतून आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा जिल्ह्याच्या विकासासाठी नागरिक, तज्ज्ञ, युवा आणि विविध क्षेत्रातील घटकांना एका व्यासपीठावर आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

गडचिरोलीचा विकास केवळ योजनांपुरता मर्यादित न ठेवता स्थानिक गरजा, उपलब्ध संसाधने आणि भविष्यातील संधी यांचा समन्वय साधून ‘विकसित गडचिरोली 2047’चे स्वप्न साकार करण्यासाठी या कार्यशाळेत ठोस दिशा निश्चित होणार का, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!