‘व्होट बचाव, देश बचाव’ आंदोलनासाठी काँग्रेसचे रणशिंग; गडचिरोलीत नियोजन बैठक, खासदार डॉ. नामदेव किरसान यांची उपस्थिती.

0
IMG-20261026-WA0320
Spread the love

*📍 गडचिरोली*

‘व्होट बचाव, देश बचाव’ आंदोलनाच्या नियोजनासाठी गडचिरोलीत आयोजित बैठक.

गडचिरोली : देशातील लोकशाही मूल्यांचे संरक्षण, मतदारांच्या अधिकारांचे संवर्धन आणि कथित मतचोरीविरोधात आवाज उठविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘व्होट बचाव, देश बचाव – चलो दिल्ली’ आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बैठक व पत्रकार परिषद घेण्यात आली. या बैठकीला *ऑल इंडिया काँग्रेस कमिटी कडून आलेले पर्यवेक्षक आमदार बाला बच्चन, विधानसभा पक्षनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान व आमदार रामदास मसराम यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव रवि दरेकर, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, राम मेश्राम, मनोहर पाटील पोरेट्टी, अजय कंकडालवार, शहर अध्यक्ष सतीश विधाते, सिंदेवाही तालुकाध्य रमाकांत लोधे. माजी नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, ऍड. दुष्यन्त किरसान, कुसुमताई आलाम, माधुरी मडावी, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदारांच्या मतदानाच्या अधिकारांचे संरक्षण हे आंदोलनाचे प्रमुख मुद्दे असणार आहेत.

राहुलजी गांधी यांच्या या लढ्याला बळ देण्यासाठी तसेच लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वासही ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केला.

या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा, जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग, तालुकास्तरावर जनजागृती आणि दिल्लीतील आंदोलनासाठी आवश्यक नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. लोकशाही आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संघटितपणे पुढाकार घ्यावा, असे करण्यात आले.

यावेळी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!