‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानासाठी काँग्रेस सरसावली; गडचिरोलीत आज पत्रकार परिषद.

0
IMG-20261024-WA0199
Spread the love

 

बाला बच्चन, विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान आणि आमदार रामदास मसराम राहणार उपस्थित

गडचिरोली, दि. २६ ऑक्टोबर : लोकशाहीचे संरक्षण, मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानांतर्गत गडचिरोली येथे सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहून अभियानाची भूमिका आणि लोकशाहीसमोरील विविध आव्हानांवर पक्षाची भूमिका मांडणार आहेत.

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेला मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री तथा राजपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बाला बच्चन, महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान आणि आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मतदारांचे अधिकार अबाधित राखणे, मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करणे आणि लोकशाही मूल्यांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका, निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील मुद्दे आणि मतदारांच्या हक्कांबाबत महत्त्वपूर्ण मांडणी होण्याची शक्यता आहे.

आर. के. सेलिब्रेशन हॉलमध्ये आयोजन

ही पत्रकार परिषद सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता गडचिरोली येथील आरमोरी रोडवरील आर. के. सेलिब्रेशन हॉल येथे होणार आहे. या पत्रकार परिषदेला जिल्ह्यातील पत्रकारांनी तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!