पांढरी भटाळमध्ये अवैध मोहदारू निर्मितीवर पोलिसांचा छापा; ७ जणांवर गुन्हे दाखल!

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

३,२०० लिटर मोहफुलाचा सडवा आणि ८० लिटर दारू नष्ट; ३ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल उद्ध्वस्त

चामोर्शी, दि. २५ ऑक्टोबर : अवैध मोहदारू निर्मिती आणि विक्रीविरोधात चामोर्शी पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत अवैध व्यवसाय करणाऱ्यांना दणका दिला आहे. तालुक्यातील मौजा पांढरी भटाळ येथे रविवारी सकाळी ७ ते १०.३० वाजताच्या दरम्यान छापा टाकून पोलिसांनी तब्बल ३,२०० लिटर मोहफुलाचा सडवा आणि ८० लिटर मोहफुलाची तयार दारू नष्ट केली. या कारवाईत सुमारे ३ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जागेवरच उद्ध्वस्त करण्यात आला असून, सात जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची मोहीम

पांढरी भटाळ परिसरात मोहफुलाचा सडवा तयार करून त्यापासून अवैधरीत्या मोहदारूची निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीची दखल घेत चामोर्शी पोलीस पथकाने रविवारी सकाळी संबंधित ठिकाणी धडक देत कारवाई केली. यावेळी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला मोहफुलाचा सडवा आणि तयार मोहदारू आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला.

पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई

पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक शाहू दंडे, महिला पोलीस उपनिरीक्षक सातव, देशमुख यांच्यासह महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

या प्रकरणी सात जणांविरुद्ध चामोर्शी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले

अवैध दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी चामोर्शी पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पांढरी भटाळ येथे करण्यात आलेल्या या मोठ्या कारवाईमुळे परिसरातील अवैध मोहदारू निर्मिती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अवैध दारू व्यवसायाविरोधातील पोलिसांच्या या कारवाईकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

— पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, पोलीस स्टेशन चामोर्शी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!