दुष्काळी पंचनाम्यांना चामोर्शीत गती; कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

धान-कापूस पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी; शासन मदतीसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात

चामोर्शी : महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश केलेल्या चामोर्शी तालुक्यात दुष्काळी परिस्थितीच्या पंचनाम्यांना वेग आला आहे. तालुका कृषी विभागाच्या पथकांकडून गावोगावी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून नुकसानीची नोंद केली जात आहे.
सहाय्यक कृषी अधिकारी प्रदीप मुंडे यांनी रविंद्रपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतांवर भेट देत पिकांची पाहणी केली. त्यानंतर धर्मपूर परिसरातील शेतांमध्ये जाऊन धान व कापूस पिकांची सद्यस्थिती, पावसाचा परिणाम आणि संभाव्य नुकसानीची पाहणी करण्यात आली.
पंचनाम्यादरम्यान शेतकऱ्यांकडून आवश्यक माहिती संकलित केली जात असून, संबंधित कागदपत्रांबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या विविध सवलती व मदतीची माहिती देण्यात येत आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी विभागाचे अधिकारी यांच्या माध्यमातून संयुक्तपणे सर्वेक्षण सुरू आहे. नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे अचूक पद्धतीने नोंदविण्यावर प्रशासनाचा भर आहे.
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळण्यासाठी पंचनाम्यांची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त प्रत्येक शेताची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ नोंद करावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!