जमिनीच्या हक्कासाठी घारगावच्या महिला मैदानात; शांततामय आंदोलनाची सुरुवात.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

गडचिरोली (चामोर्शी), दि. २९ सप्टेंबर : जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून शेतकरी महिलांचा विरोध अधिक तीव्र होताना दिसत आहे. घारगाव, रामाळा, फराडा आणि मोहर्ली या चार गावांतील शेतकरी महिला व ग्रामस्थांनी सोमवारी एकत्र येत शांततामय रॅली काढून जमीन अधिग्रहणाला विरोध नोंदविला.

घारगाव, रामाळा आणि फराडा येथून रॅली काढण्यात आली. विविध घोषणा देत शेतकरी महिला व ग्रामस्थांनी आपल्या जमिनी, उपजीविका आणि हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी केली. रॅलीला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चारही गावांमधून मार्गक्रमण केल्यानंतर रॅलीचा समारोप मोहर्ली येथे करण्यात आला. यावेळी शेतकरी महिलांनी जमीन अधिग्रहणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत लोकशाही व शांततामय मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, यापुढे दर मंगळवारी शांततामय आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी महिलांनी जाहीर केला आहे. १४ गावांतील शेतकरी व महिलांची एकजूट या आंदोलनाच्या माध्यमातून पुढे येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहणाच्या प्रश्नावर प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार, याकडे शेतकरी व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!