महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना गडचिरोली तर्फे 24 तास धरणे;जुनी पेन्शनसह 15 मागण्यासाठी आंदोलन.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

 

IMG 20260924 204921

गडचिरोली | प्रतिनिधी
निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक आणि राज्य सरकारच्या ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पेंशनर्स संघटना, शाखा गडचिरोली यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २९ व ३० सप्टेंबर रोजी २४ तासांचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होणारे आंदोलन बुधवार, ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत चालणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. हे आंदोलन अखिल भारतीय राज्य सरकारी पेंशनर्स फेडरेशन (AISGPF) च्या बॅनरखाली करण्यात येणार आहे.
जुन्या पेन्शन योजनेची सर्वांना अंमलबजावणी करावी, NPS व UPS रद्द कराव्या, पीएफआरडीए विधेयक रद्द करावे, निवृत्तीवेतनात ५० टक्के महागाई भत्ता विलीन करावा, प्रलंबित १८ महिन्यांचा महागाई भत्ता तातडीने द्यावा, कुटुंब निवृत्तीवेतनाचे दर वाढवावेत तसेच अतिप्रदानाची वसुली थांबवून वसूल केलेल्या रकमा परत कराव्यात, अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत.
याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे व विमान प्रवासात सवलत, निवृत्तीवेतन विक्रीची कपात दहा वर्षांनंतर बंद करणे, विविध वेतनश्रेणी व पदोन्नतीसंबंधी मागण्यांसह एकूण १५ मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
“हमारी युनियन हमारी ताकद, इन्कलाब जिंदाबाद, संघर्ष हमारा नारा है, भावी इतिहास हमारा है,” असा निर्धार व्यक्त करत मोठ्या संख्येने पेन्शनर्सनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.
संघटनेच्या अध्यक्ष विमल अंबाडकर, सचिव परवीन शेख, कार्याध्यक्ष जिजा घोडाम, कोषाध्यक्ष सुनंदा सलाम आणि उपाध्यक्ष अर्चना भैसारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!