भाजपा कर्तव्य कक्षात श्रीगणेशाची भक्तिभावाने स्थापना.

0
IMG-20260914-WA0263
Spread the love

माजी खासदार डॉ. अशोक नेते व आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते पूजा-अर्चना

गडचिरोली, दि. १४ सप्टेंबर २०२६ : गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वानिमित्त गडचिरोली शहरातील आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या भाजपा कर्तव्य कक्ष कार्यालयात श्रीगणेशाची विधिवत व भक्तिभावाने स्थापना करण्यात आली. यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी श्रीगणरायाची मनोभावे पूजा-अर्चना करून आरती केली.

गणरायाच्या आगमनाने कर्तव्य कक्ष परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी श्रीगणेशाचे दर्शन घेत जिल्ह्यात सुख, शांती, समृद्धी आणि बंधुभाव नांदावा, अशी प्रार्थना केली.

या प्रसंगी डॉ. अशोक नेते आणि डॉ. मिलिंद नरोटे यांनी एकत्रितपणे गणरायाची पूजा करत जनसेवा, समाजहित आणि गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची मंगलकामना व्यक्त केली. दोन्ही नेत्यांमधील स्नेह, आपुलकी व समन्वयाची भावना यावेळी विशेषत्वाने जाणवून आली.

गणेशोत्सव हा धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक एकोपा, सद्भावना आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा उत्सव आहे. याच भावनेतून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन जनहिताच्या कार्याला बळ द्यावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

श्रीगणरायाच्या चरणी गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या प्रश्नांची प्रभावीपणे सोडवणूक व्हावी आणि प्रत्येक कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

या वेळी भाजपा पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!