गडचिरोलीत ‘छात्रो की गुंज’ची महा मॅरेथॉन; १० हजारांहून अधिक युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग.
Oplus_131072
ॲड. दुष्यंत किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व मोफत अभ्यासिकेचे लोकार्पण
गडचिरोली, दि. १३ सप्टेंबर : काँग्रेसचे नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ या उपक्रमातून प्रेरणा घेत, खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. दुष्यंत नामदेव किरसान मित्रपरिवाराच्या वतीने गडचिरोली येथे भव्य महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला संपूर्ण विदर्भातून युवक-युवतींचा मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल १० हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा, गोंदिया तसेच विदर्भातील विविध भागांतून युवक-युवती या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. युवकांमध्ये आरोग्य, क्रीडा, शिस्त आणि सकारात्मक ऊर्जेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, ॲड. दुष्यंत नामदेव किरसान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. विनोद बाबर यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण तसेच भविष्यातील शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमादरम्यान खासदार डॉ. नामदेव जी. किरसान यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी, उपलब्ध शैक्षणिक संधी आणि भविष्यातील करिअरचे नियोजन याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या संवादाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोफत अभ्यासिकेचे लोकार्पण
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गडचिरोली येथे मोफत अभ्यासिकेचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनुकूल वातावरण मिळणार आहे.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, ॲड. दुष्यंत नामदेव किरसान, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट, आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलाम, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रमोद भगत, वसंत राऊत, राजेंद्र बुल्ले, मनोज अग्रवाल, विजय पाटील गावंडे, खेमराज तिडके, प्रमोद चौधरी, नितीन गोहने, प्रशांत कोराम, प्रमोद गोटेवार, शंकरराव सालोडकर, प्रभाकर वासेकर, माधव गावड, इशुलालजी भालेकर, देवकांत बहिकार, राजेश ठाकूर, देवाजी सोनटक्के, रवींद्र पाल, दत्तात्रय खरवडे, दिवाकर निसार, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, कुणाल पेंदोरकर, श्रीकांत देशमुख, मनोज ढोरे, हरबाजी मोरे, दिलीप घोडाम, विनोद लेनगुरे, परमेश्वर गावडे, प्रतीक बारसिंगे, विजय लाड, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलेट्टीवार, उत्तम ठाकरे, धिवरू मेश्राम, जावेद खान, स्वप्नील बेहरे, कमलेश खोब्रागडे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक-युवती, पालक आणि नागरिक उपस्थित होते.
