संत निरंकारी मिशनतर्फे चामोर्शीत भव्य रक्तदान शिबिर; माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते उद्घाटन.

0
IMG-20260913-WA0136
Spread the love

 

चामोर्शी : संत निरंकारी मिशन, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (दिल्ली), ब्राँच चामोर्शी यांच्या वतीने रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी संत निरंकारी सत्संग भवन, चामोर्शी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसन नागदेवे, झोनल इन्चार्ज, वडसा हे होते. प्रमुख अतिथी म्हणून गजानन तनकुलवार, खुशाल झोडगे, ओमप्रकाश साखरे, डॉ. अंजली साखरे, कन्नाके महाराज, जीवनकला बोरकुटे, अशोक बोरकुटे, गिरीधर कन्नाके, मिटपल्लीवर महाराज, घनश्याम बोदलकर, सुरेश बावणे, नंदू रायसिडाम, सुभाष ढाली आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी रक्तदान हे अत्यंत श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. संत निरंकारी मिशन व संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे त्यांनी कौतुक केले.
रक्तदान शिबिराला नागरिक, युवक तसेच मिशनच्या अनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजहितासाठी आयोजित या उपक्रमातून मानवसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!