ॲड. दुष्यंत किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन सोहळा.

0
IMG-20260912-WA0121
Spread the love

 

गडचिरोली : ॲड. दुष्यंत नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आर. के. सेलिब्रेशन हॉल, आरमोरी रोड, गडचिरोली येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्यात प्रा. डॉ. विनोद बाबर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, शासकीय तसेच खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि भविष्यातील करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक भवितव्यासाठी हा मार्गदर्शन सोहळा उपयुक्त ठरणार असून, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. दुष्यंत नामदेव किरसान मित्र परिवार, गडचिरोली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!