मार्कंडा देव मंदिर सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी; आशु पोहल, अनिरुद्ध पालकर यांची भेट
Oplus_131072
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत
चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक मार्कंडा देव तीर्थक्षेत्राला वाल्मिकी समाज आयोगाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा असलेले आशु पोहलजी आणि मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) अनिरुद्ध पालकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मार्कंडा देव मंदिरात विधिवत पूजा-अर्चना करून मंदिर परिसरातील सुरू असलेल्या सुशोभीकरण व विकासकामांची पाहणी केली.
मार्कंडा देव येथे आगमन झाल्यानंतर भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी आणि भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी आशु पोहलजी व अनिरुद्ध पालकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची सद्यस्थिती, सुशोभीकरणाची कामे तसेच तीर्थक्षेत्राच्या भविष्यातील विकासाबाबत चर्चा करण्यात आली. ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या मार्कंडा देव तीर्थक्षेत्राचा विकास अधिक नियोजनबद्ध व प्रभावी पद्धतीने करण्याच्या दृष्टीने विविध बाबींवर यावेळी माहिती घेण्यात आली.
याप्रसंगी भाजपा OBC आघाडीचे भास्कर बुरे, दिलीप चलाख, जयराम चलाख, शेषराव कोहळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
