एक हात मदतीचा; अपघातग्रस्त मित्रासाठी मित्रपरिवाराची मदतीची हाक.
चामोर्शीत गंभीर अपघातात जखमी झालेल्या गितेश वैरागडे यांना आर्थिक मदतीचे आवाहन

चामोर्शी : येथील मुख्य बसस्थानकाजवळ दि. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या गंभीर अपघातात गितेश अशोक वैरागडे (वय २९ वर्षे) हे जखमी झाले आहेत. गितेश हे अभ्यासू, होतकरू आणि मेहनती युवक असून सध्या त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांच्या मित्रपरिवाराच्या ‘Frnds for Life’ ग्रुपच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. गितेश यांच्या उपचारासाठी व कुटुंबाला आधार देण्यासाठी मित्र, नातेवाईक तसेच समाजातील दानशूर नागरिकांनी आपल्या परीने आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मदत करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी फोन पे/गुगल पेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करून त्याचा स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जमा झालेली एकत्रित मदतीची रक्कम गितेश यांच्या परिवाराकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
मदतीसाठी संपर्क :
Pravin Naitam
📱 Google Pay / PhonePe : 7387807039
“मित्र अडचणीत असताना त्याच्या पाठीशी उभे राहणे, हीच खरी मैत्री!” 🤝🙏

