चामोर्शी तालुक्यातील वाघोली शिवारात झालेल्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात चामोर्शी पोलीसांना यश.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

                         प्रेसनोट

IMG 20260908 104208

नशा करतांना झालेल्या बाचाबाचीतुन मुलच्या बंटी मिश्राचा खुन करणाऱ्या दोन विधीसंघर्षीत बालकांना चामोर्शी पोलीसांनी घेतले ताब्यात,

दिनांक 07/09/2026  रोजी रात्री 10.30 वा. च्या सुमारास चामोर्शी पोलीसांना माहिती मिळाली की, मोजा वाघोली, ता. चामोर्शी शिवारात चामोशी ते मुल जाणाऱ्या रोडपासून सुमारे 100 मिटर अंतरावर एका शेतरस्त्याच्या बाजुला कापसाच्या शेतात पुरुषाचा मृतदेह दिसत असून त्याचा खुन झालेला असल्याचे सांगीतले. सदरची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  महादेव ढाकणे, भेंडाळा बीटचे बोट अधिकारी श्री सुमेध बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश जंगले, श्री शाहु दंडे, पोलीस हवालदार हेमराज वाघाडे, पोशि/अतुल मडावी, देवेंद्र दुर्गे, शशिधर चिडे, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री श्रीवास, पोशि हेमंत सहारे हे तात्काळ रवाना होऊन घटनास्थळी दाखल झाले. सदर ठिकाणाची पाहणी करुन सदर प्रकरणी सखोल तपास करणे आवश्यक असल्याने पोलीस निरीक्षक श्री महादेव ढाकणे यांनी तात्काळ गडचिरोली येथून फॉरेन्सीक एक्सपर्टचे पथक, डॉग स्कॉड व फिंगर प्रिंट ब्युरोला घटनास्थळी बोलावून घेतले. तज्ञांच्या मदतीने सविस्तर घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. त्यावेळी मयताचे अंगावर त्याची ओळख पटविण्यासाठी कोणतीही वस्तू किंवा चिड्डी मिळून आली नाही. त्यामुळे मयताची ओळख पटविणे हे पोलीसांसमोर पहिले आव्हान होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक श्री महादेव ढाकणे व इतर तपास अधिकारी यांना तात्काळ मयताचे फोटो घेऊन मयताची ओळख पटविण्यासाठी काम सुरु केले. त्यासोबतच परीसरातील CCTV चे फुटेज तसेच महत्वाच्या ठिकाणी विचारपूस करुन गुन्हा उघडकिस आणण्याची प्रक्रीया चालू केली. परंतू सकाळपर्यंत मयताची ओळख पटू शकली नाही. म्हणून चामोशी पोलीसांनी मयताचे प्रेत ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथील शवगृहात दाखल केले. तसेच मयताचे आणखी स्पष्ट दिसणारे व ओळख पटविण्यासाठी आवश्यक असलेले फोटो घेऊन सोशल मिडीयाचे विविध ग्रुपवर शेअर केले. तसेच जिल्हयातील व आजुबाजुच्या जिल्हयात देखील सदरचे फोटो पाठवून तपासाला गती दिली. त्यानंतर दिनांक 08/09/2026 रोजी सकाळी 11.00 वा. च्या सुमारास मयताचे नाव नंदकिशोर मोतीलाल मिश्रा ऊर्फ बंटी, वय 34 वर्षे, रा. तेली मोहल्ला, वार्ड क्र. 5, श्रीराम मंदिराजवळ, मुल, ता. मुल, जि. चंद्रपूर असल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी मुल येथील स्थानिक पोलीसांची मदत घेऊन मयताचे घरी जाऊन मयताची बहिण अर्चना मोतीलाल मिश्रा यांची भेट घेतली व त्यांना घटनेची माहिती देऊन नंदकिशोर मोतीलाल मिश्रा ऊर्फ बंटी हाच मयत असल्याची खात्री केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी गुन्ह्याच्या तपासाचे पुढील पाऊल टाकुन आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न सुरु केले व काही संशयीतांना विचारपूस केली परंतू खात्रीशीर माहिती प्राप्त झाली नाही,

दरम्यान मा. पोलीस अधीक्षक  एम. रमेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  गोकुळ राज जी. साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक उत्तर विभाग, गडचिरोली व  अनिकेत हिरडे साहेब, सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग गडचिरोली यांनी दिनांक 08/09/2026 रोजी पोलीस ठाणे चामोर्शी येथे भेट

देऊन सदर गुन्हयाची सविस्तर माहिती घेतली व तपासाबाबत पोलीस निरीक्षक श्री महादेव ढाकणे व तपासी अधिकारी श्री सुमेध बनसोडे यांना काही महत्वाच्या सुचना दिल्या. त्यानुसार दिनांक 09/09/2026 रोजी पोलीस निरीक्षक श्री महादेव ढाकणे यांनी सपोनि. श्री सुमेध बनसोडे, पोउपनि, श्री गणेश जंगले व पोउपनि, श्री शाहु दंडे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे तपास पथक तयार करुन मा. वरिष्ठांच्या सुचना व दिनांक 08/09/2026 रोजी केलेल्या तपासाच्या आधारे पुढील तपासास गती दिली. तसेच संशीतांना बोलावून घेऊन व त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे स्वतंत्रपणे विचारपूस केली असता मुल, जि. चंद्रपूर येथील दोन विधीसंघर्थात बालकांनी मयत नंदकिशोर मोतीलाल मिश्रा याचा खुन केला असल्याचे कबुल केले.

सदर विधीसंघषित बालकांकडे गुन्हयाच्या कारणाबाबत विचारपूस करता त्यांनी सांगीतले की, आम्हाला गांजा ओढायचा होता व नंदकिशोर मिश्रा ऊर्फ बंटी याच्याकडे गांजा मिळतो म्हणून दिनांक 07/09/2026 रोजी दुपारी 3.00 वा. च्या सुमारास ते दोघे नंदकिशारे ऊर्फ बंटीच्या घरी गेले, त्यानंतर नंदकिशोर ऊर्फ बंटी याने गांजा उपलब्ध नसल्याचे सांगीतले व मागवून घ्यावा लागेल असे सांगीतले. तेव्हा दोन्ही विधीसंघर्षित बालक यांनी आम्हो तुझ्या गाडीत पेट्रोल टाकता व तुझ्या सोबत येतो परंतू तु आम्हाला गांजा दे असे म्हणाले. त्यानुसार मयत नंदकिशोर ऊर्फ बंटी व दोन विधीसंघीत बालक असे दुपारी 4.00 वा. च्या सुमारासं मुल येथून निघून चामोर्शी येथे आले. तेथे ग्रामीण रुग्णालयाजवळ आष्टी रोडवर एका ट्रकजवळ मयत नंदकिशोर ऊर्फ बंटी याने एका व्यक्तीकडून गांजा घेतला, एका दुकानावरुन RC ची एक दारुची बाटली घेतली. त्यानंतर मुल रोडवरील एका दुकानातून पाण्याच्या 2 बॉटल, प्लास्टीक ग्लास, हल्दीरामचा चिवडा इत्यादी खरेदी केले, अंधार होत असल्याने व बंटीच्या मोटारसायकलचा हेडलाईट बंद असल्याने एका गॅरेजवरुन त्यांनी हेडलाईट सुरु करुन घेतला. त्यानंतर मुल कडे जात असतांना वाघोली शिवारातील घटनास्थळी ते गेले. त्यावेळी साधारणपणे रात्रीचे 8.30 वाजले असतील. त्यानंतर त्यांनी तेथे प्रथम दारु पिलो, गांजा ओढला. सदर ठिकाणी नशा करीत असतांना बोलता बोलता त्यांच्यात शिवीगाळ झाली. म्हणून एका विधीसंघर्षित बालकाने मयत नंदकिशोर ऊर्फ बंटी मिश्रा यास एका दगडाने मारले. त्यावेळी बंटीने सदर दोघांना आणखी घाण घाण शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणून दोन्ही विधीसंघर्षात बालकांनी दगळ व मोटारसायकल सोबत असलेला रॉडचा टी पान्हा डोक्यात मारुन गंभीर दुखापत करुन जीवे ठार मारले व मयत नंदकिशोर ऊर्फ बंटी मिश्रा याच्या मोटारसायकलवरुन मुल कडे पळून गेले, पळून जात असतांना खून करण्यासाठी वापरलेला टी पान्हा कोठेरी फेकुन दिला असल्याची माहिती दिली. त्यावरुन दोन्ही विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून पुढील तपासाची प्रक्रीया सुरु केली आहे.

सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मा. श्री एम. रमेश साहेब, पोलीस अधीक्षक गडचिरोली, मा. श्री गोकुळ राज जी. साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली, मा. श्री अनिकेत हिरडे साहेब, सहाय्यक पोलीस अधीक्षक साहेब, उपविभाग गडचिरोली, मा. श्री अरुण फेगडे साहेब, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांनी मार्गदर्शन केले. तसेच मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चामोर्शीचे पोलीस निरीक्षक  महादेव ढाकणे, भेंडाळा बीटचे बीट अधिकारी  सुमेध बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक  गणेश जंगले,  शाहु दंडे, पोह हेमराज वाघाडे, पोह/विजय नंदेश्वर, पोशि/अतुल मडावी, देवेंद्र दुर्गे, शशिधर चिडे, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक  श्रीवास, पोशि हेमंत सहारे यांनी अतिशय गतीने तपास करुन गुन्हा उघडकीस आणला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!