सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे गडचिरोलीत आगमन; मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

गडचिरोली | दि. २७ ऑगस्ट २०२६

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्रीमंत  शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आज गडचिरोली शहरात दौऱ्यानिमित्त आले असता, माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले.

यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित विविध विकासकामे, रस्ते व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांना अधिक गती मिळावी, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून भरीव कामे व्हावीत, अशी अपेक्षा डॉ. अशोकजी नेते यांनी व्यक्त केली. मंत्री महोदयांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना निश्चितच अधिक चालना मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी आमदार क्रिष्णा गजबे,महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,शहर अध्यक्ष तथा सभापती सिमा कन्नमवार, नगरसेविका शिल्पा गव्हारे, ज्ञानेश्वरी धंदरे,अर्चना निंबोंड, कि.मो. जिल्हाध्यक्ष विलास पा.भांडेकर, आनंद भांडेकर, बंडू झाडे,संजय बारापात्रे,नंदु पेट्टेवार,तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!