जिल्हा गौरव पुरस्कार वितरण सोहळा, ‘नवी दिशा, नवा गडचिरोली’ : व्हिजन 2047च्या माध्यमातून विकसित गडचिरोलीचा संकल्प.
Oplus_131072
गडचिरोली, दि. 26 ऑगस्ट 2026 : गडचिरोली जिल्ह्याच्या वर्धापन दिनानिमित्त ‘नवी दिशा–नवा गडचिरोली’ या संकल्पनेतून ‘विकसित गडचिरोली – व्हिजन 2047’ या महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनाचे सादरीकरण व संबोधन आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.
डॉ. देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात विकसित गडचिरोलीच्या भविष्यातील विकासाचा आराखडा, विकासाच्या नव्या संधी तसेच जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम 26 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता स्वर्गीय राजीव गांधी सभागृह, गडचिरोली येथे होणार आहे. जिल्हा वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ वितरण सोहळाही पार पडणार आहे.
गडचिरोलीच्या नैसर्गिक, सांस्कृतिक आणि मानवी संपदेचा प्रभावी वापर करून जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी व्हिजन 2047 महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विकासाची नवी दिशा आणि दीर्घकालीन नियोजन या कार्यक्रमातून अधोरेखित होणार आहे.
