चामोर्शीत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते उत्साहात स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण.
Oplus_131072
चामोर्शी : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त चामोर्शी येथे आज, १५ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. मा. संपत खलाटे, उपविभागीय अधिकारी, चामोर्शी यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला.
यावेळी मा. प्रशांत घोरुडे, तहसीलदार चामोर्शी, तारेश फुलझले,नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे व अन्य पोलीस कर्मचारी,मा. जाधव, उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, अधिकारी व कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसर हिरवाईने नटविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

देशभक्तीच्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले.

