चामोर्शीत भाजपा आदिवासी मोर्चाच्या जनसंपर्क कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात; माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते ध्वजारोहण.
Oplus_131072
चामोर्शी : भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना यावेळी अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि विकास अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला साईनाथ बुरांडे, दिलीप चलाख, जयराम चलाख, सुनील सोरते, पुरुषोत्तम बावणे, महादेव थोरेवार, प्रज्वल सोमणकर, शाहरुख पठाण, गजानन तालापल्लीवर, रवींद्रसिंहा चव्हाण, दिलीप नैताम यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रप्रेम आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
