गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व दोन चारचाकी वाहनांसह एकूण 27,70,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.
प्रेस नोट

गडचिरोली:-दिनांक- 30/10/2026
• पोस्टे एटापल्ली पोलीसांनी प्रभावी कामगिरी करत केली एकूण 06 आरोपींना अटक
गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन काल दिनांक 29 ऑक्टोबर 2026 रोजी पोस्टे एटापल्ली पोलीस पथकाने सापळा रचून अवैध देशी-विदेशी दारूची वाहतुक करणाया आरोपींविरुध्द कारवाई केलेली आहे.
सविस्तर वृत असे आहे की, काल दिनांक 29 ऑक्टोबर 2026 रोजी पोलीस स्टेशन एटापल्ली हद्दीत पोलीस पथक रात्रगस्त करीत असताना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मौजा जिवनगट्टा गावात दोन संशयीत वाहने देशी दारु माल उतरवित आहेत. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन एटापल्ली पोलीस पथकाने जीवनगट्टा ते बारसेवाडा रोड येथे सापळा रचला. काही वेळातच एक पांढया रंगाची स्कॉर्पिओ गाडी जीवनगट्टा ते बारसेवाडा रोडच्या गल्लीत दारू टाकण्यासाठी आली त्या पाठोपाठ लगेच एक काळया रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी आली. पाढया स्कॉर्पिओ मधून दारूच्या पेट्या काळया स्कॉर्पिओमध्ये भरल्या जात असतांना पाठीमागून व समोरून पोलिसांच्या गाड्या वाहने येत असल्याच्या आरोपींच्या लक्षात आले. त्यामुळे आरोपींनी वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी शिताफीने दोन्ही वाहने दोन्ही बाजूने अडविल्याने आरोपींचा पळून जाण्याचा प्रयत्न निष्फळ झाला. पोलीस पथकाने घटनास्थळावरुन एकूण 06 आरोपींना ताब्यात घेतले मात्र अंधाराचा फायदा घेवुन 02 इसम घटनास्थळावरुन पसार झाले.
घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेले 06 इसम 01) आकाश प्रशांत मुजुमदार, वय 32 वर्षे रा. एटापल्ली. गडचिरोली 2) अफसर शेख हुसेन वय 36 वर्ष रा. बडा ताजबाग नागपूर. 3) प्रशांत बजरंग आंबटकर वय 43 वर्ष रा. नंदुरी ता. समुद्रपूर जि. वर्धा 4) पंकज शामल बारई, वय 29 वर्ष, रा. जांबिया गट्टा, जिल्हा गडचिरोली. 5) तुषार मिहीर रॉय, वय 25 वर्ष राहणार, रा. टी.व्ही 79 जनकपुर, पाखंजुर जिल्हा कांकेर (छ.ग) ह.मु.गडचिरोली 6) सुरत सत्यजित मंडल, वय 21 वर्ष, रा. टी व्ही 102 किसकनगर, पाखंजुर, जिल्हा कांकरे (छ.ग) ह.मु. गडचिरोली यांच्याकडे अवैध दारुच्या मुद्देमालाबद्दल व पळून गेलेल्या इसमांबद्दल कसून चौकशी केली असता, आरोपींनी एकूण 60 पेटी देशी दारु मुद्देमाल आणला असून त्यातील 29 पेटी जिवनगट्टा येथिल इसम नामे- 01) संतोष नरोटे याचे घरी टाकला आहे व पळून गेलेले इसम 02) गौरव प्रभाकर माकोडे, 03) मिथुन निर्मल मलिक असे असल्याचे सांगितले.
यानंतर पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर दोन्ही चारचाकी वाहनाची पाहणी केली असता तसेच इसम नामे- संतोष नरोटे याचे घरझडती घेतली असता चारचाकी वाहने व संतोष नरोटे याच्या घरामध्ये एकूण खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला. 01) रॉकेट देशी दारू संत्री कंपनीचे 22 बॉक्स, प्रती बॉक्स 100 नग, एकूण किंमत 2,20,000/- रुपये, 02) प्रिमियम नं.1 कोकण देशी दारूचे 18 बॉक्स, प्रती बॉक्स 100 नग, एकूण किंमत 1,80,000/- रुपये,03) पांढया रंगाची स्कॉर्पिओ वाहन क्र. एम.एच 31 सी डीसी 6816 अंदाजे किंमत 8,00,000/- रुपये, 04) काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वाहन क्र. सी. जी. 05 ए.क्यु 1326 अंदाजे किंमत 15,00,000/- रुपये 05) आरोपींच्या अंगझडतीतून मिळून आलेले 07 मोबाईल फोन अंदाजे किंमत 70,000/- रुपये. असा एकूण 27,70,000/- रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला आहे.
वर नमुद आरोपींविरुद्ध पोलीस अभिलेखावर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून सुद्धा ते वारंवार संघटीतपणे गुन्हे करण्याच्या सवयीचे असल्याने पोस्टे एटापल्ली येथे अप क्र. 207/2026 कलम 112 (2) भा. न्या. सं. 2023 सहकलम 65 (ई), 98, 83 म.दा.का. अन्वये वर नमुद 09 आरोपींविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्राचा पुढिल तपास पोउपनि. चंद्रकांत लांबट पोस्टे एटापल्ली हे करीत असुन 06 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत पाहिजे आरोपी क्र. 01) संतोष नरोट, रा. जिवनगट्टा, 02) गौरव प्रभाकर माकोडे, रा. वर्धा, 03) मिथुन निर्मल मलिक, रा. गट्टा जांभीया या तिन्ही आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक, गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली संतोष बरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे एटापल्ली प्रभारी अधिकारी पोनि. मचिंद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात पोउपनि. चंद्रकांत लांबट व अंमलदार यांनी पार पाडली.

