गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी व प्रोजेक्ट कृषी समृद्धी अंतर्गत अतिदुर्गम भागातील शेतकरी कृषीदर्शन व अभ्यास दौरा सहलीकरीता रवाना.

0
IMG-20261026-WA0282
Spread the love

                       प्रेस नोट

गडचिरोली:-

• आतापर्यंत सतरा कृषी सहलीतून 775 शेतक¬­यांनी घेतला कृषी दर्शन सहलीचा लाभ

गडचिरोली जिल्ह्रातील शेतकरी पारंपरिक पध्दतीने शेती करीत आहेत. त्यामुळे शेती मधुन प्राप्त होणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने त्यांच्या आर्थिक विकासास अडथळा निर्माण होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास अडचण निर्माण होत आहे. जिल्ह्रातील शेतकरी जिल्ह्राबाहेर पडून, पारंपरिक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करणा¬या शेतक¬­यांच्या बांधावर जाऊन तेथील परीस्थितीची, आधुनिक शेती व उपकरणांची पाहणी करतील व त्या ज्ञानाचा वापर करून पारंपरिक शेती पध्दतीत बदल करतील व जिल्ह्रातील शेतक¬­यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली येथून एकूण 43 शेतक¬­यांकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून “प्रोजेक्ट कृषी समृद्धी अंतर्गत” अठराव्या कृषीदर्शन व अभ्यास दौ­¬याचे आयोजन करण्यात आले आहे.

यापुर्वी झालेल्या एकूण सतरा कृषी दर्शन सहल व अभ्यास दौ¬­यांमध्ये दुर्गम भागातील विविध उपविभागातून एकूण 775 महिला व पुरुष शेतक­¬यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या अठराव्या सहलीमध्ये भामरागड उपविभागातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें हद्दीतील अतिदुर्गम भागातील 43 शेतक-­यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या सहलीदरम्यान सहभागी शेतकरी नागपूर, बडनेरा, अकोला, शेगाव, जळगाव, वेरुळ, राहुरी, पैठण, संभाजीनगर, परभणी, यवतमाळ, वरोरा, घातखेड येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच विविध शेती प्रक्षेत्र यांना भेटी देणार आहे. त्याचप्रमाणे शेतीविषयक अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान जाणुन घेणार आहेत. यामुळे ते प्रगत तंत्रज्ञानाचे अनुभव आपल्या शेती व्यवसायामध्ये वापरून आपली आर्थिक उन्नती साधुन जिवनमान उंचावतील त्यामुळे जिल्ह्रातील विकासात त्यांचे योगदान असणार आहे.

सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक, गडचिरोली  एम. रमेश यांचे मार्गदर्शनात दि. 26/10/2026 पासुन दि. 03/11/2026 रोजी पर्यंत एकूण 09 दिवस आयोजित करण्यात आला असून, या अठराव्या कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा कार्यक्रमास पोलीस अधीक्षक गडचिरोली  एम रमेश यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. तसेच सदर कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  गोकुल राज जी. हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके, पोस्टे मन्ने राजारामचे पोउपनि. स्वरुप भुजबळ, परि पोउपनि. विवेक लोंढे व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!