महिला व बाल रुग्णालय, अहेरीच्या वैद्यकीय टीमचे कौतुक; सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वी.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

डॉ. शिवराम कुमरे व त्यांच्या टीमच्या तत्पर सेवेमुळे रुग्णाच्या कुटुंबीयांकडून मानले आभार

अहेरी : महिला व बाल रुग्णालय, अहेरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराम कुमरे आणि त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय टीमने तमिस सातार यांची सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत योग्य उपचार व वैद्यकीय सेवा दिली. त्यांच्या तत्परतेबद्दल, सहकार्याबद्दल आणि आपुलकीच्या वागणुकीबद्दल रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांसह संपूर्ण वैद्यकीय पथकाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय पथकाने दाखवलेली तत्परता, अनुभव आणि सेवाभावी वृत्ती यामुळे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. डॉक्टर हे केवळ उपचार करणारे नसून संकटाच्या काळात रुग्णांना धीर देणारे आणि नव्या आशेचा किरण दाखवणारे असतात, अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.

डॉ. शिवराम कुमरे व त्यांच्या संपूर्ण टीमने दिलेली वैद्यकीय सेवा आणि सहकार्य सदैव स्मरणात राहील, असे सांगत कुटुंबीयांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच भविष्यातही अशाच सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा करून अनेक रुग्णांना आरोग्य आणि आनंद मिळवून द्यावा, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

रुग्णसेवा हीच खरी मानवसेवा! अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने केलेल्या सहकार्याबद्दल व्यक्त करण्यात आलेली कृतज्ञता ही डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वासाचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!