राज बन्सोड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रुग्णांना फळवाटप.
चामोर्शी : आजाद समाज पार्टीच्या वतीने पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमातून रुग्णांच्या आरोग्याप्रती संवेदनशीलता जपत सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. महापुरुषांच्या विचारांवर चालत समाजातील गरजू व रुग्णांना मदतीचा हात देणे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
यावेळी रुग्णांना फळवाटप करताना आजाद समाज पार्टीचे जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, युवा तालुका अध्यक्ष प्रतीक खोब्रागडे, तालुका सचिव आकाश दुर्गे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गामावर, करण पोरटे, साहिल दिकोंडावर तसेच चामोर्शी तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

