गडचिरोलीत दारू तस्करीचा पर्दाफाश; दुचाकींच्या पेट्रोल टाकीतून २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

0
IMG-20261019-WA0223
Spread the love

                           प्रेस नोट

छूप्या पध्दतीने अवैध दारु वाहतूक करणा­या आरोपींवर कारवाई करून गडचिरोली पोलीसांनी केला दूचाकी वाहनांसह एकूण 2,32,000/- रुपयांचा मुद्येमाल जप्त

श्व् दूचाकी वाहनांची संरचना बदलवून छुप्या पद्धतीने अवैध दारुच्या वाहतूकीचा प्रयत्न
श्व् गडचिरोली जिल्ह्याच्या सीमांवर 24 तास नाकाबंदी राबविण्यात येत असून त्या माध्यमातून अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे आळा घालण्यात येत आह

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी अवैध दारु विक्री व वाहतूक करणा­यांवर प्रभावीपणे कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन काल दिनांक 18 ऑक्टोंबर 2026 रोजी पोलीस स्टेशन, गडचिरोली येथील पथकाने गडचिरोली ते चंद्रपूर रस्त्यावर वैनगंगा नदीजवळ अवैद्य दारूची वाहतुक करणा­या आरोपींविरुध्द कारवाई केलेली आहे.

सविस्तर वृत असे आहे की, काल दिनांक 18 ऑक्टोंबर 2026 रोजी गडचिरोली ते चंद्रपूर रोडवरील वैनगंगा नदीजवळ पोलीस स्टेशन, गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदार नाकाबंदी करीत असताना, गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, इसम नामे तानाजी नानाजी पेंदोरकर, वय 32 वर्षे हा इसम त्याच्या दूचाकी वाहनाने अवैद्ध देशी-विदेशी दारुची वाहतूक करणार आहे. यावेळी पोस्टे गडचिरोली येथील पोलीस पथकाने नाकाबंदी दरम्यान दोन संशयीत इसम आपल्या ताब्यातील दूचाकी भरधाव वेगाने चालवून गडचिरोलीच्या दिशेने येताना दिसून आले. यानंतर पोलीस पथकानी सदर दोन्ही इसमास हात दाखवून थांबवून त्यांस त्यांचे नाव व गाव विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव 1) तानाजी नानाजी पेंदोरकर, वय 32 वर्षे व 2) सौरभ प्रकाश महाजनवार, वय 19 वर्षे, दोघेही रा. व्याहाड (बु.) ता. सावली, जि. चंद्रपूर असे सांगितले.

यानंतर पोलीस पथकाने पंचांसमक्ष सदर दूचाकी वाहनांची तपासणी केली असता, सदर दूचाकी वाहन क्र. एम एच 34 ए ई 8865 च्या पेट्रोल टॅक व सिटच्या आत 1) 90 एम एल मापाचे रॉकेट संत्रा देशी दारुच्या 200 नग निप एकूण किंमत 16,000/- रुपये, तसेच निळ्या रंगाच्या पल्सर दूचाकी वाहन क्र. एम एच 34 ए एक्स 9809 च्या पेट्रोल टॅक व सिटच्या आत 2) 90 एम एल मापाचे रॉकेट संत्रा देशी दारुच्या 200 नग निप एकूण किंमत 16,000/- रुपये यासोबतच वाहतूकीकरीता वापरण्यात आलेल्या 3) 2 नग दुचाकी प्रत्येकी अंदाजे किंमत 1,00,000/- रुपये एकूण 2,00,000/- रुपये असा एकूण 2,32,000/- रुपयांचा मुद्देमाल अवैद्धरित्या विना परवाना छुप्या पद्धतीने वाहतुक करीत असल्याचे आढळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे.

संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे गडचिरोली येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र. 1566/2026 कलम 65 (अ), 83 म.दा.का. अन्वये आरोपी नामे 1) तानाजी नानाजी पेंदोरकर, वय 32 वर्षे व 2) सौरभ प्रकाश महाजनवार, वय 19 वर्षे, दोघेही रा. व्याहाड (बु.) ता. सावली, जि. चंद्रपूर यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून पोस्टे गडचिरोली पोलीस सदर गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली  एम. रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक  गोकुल राज जी., प्रभा. सहा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली  सुयश सिंग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन, गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि. . विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!