‘पाड्यावरचा चहा’चा शुभारंभ 17 ऑक्टोबरला; चामोर्शीत तयारीला वेग.

0
IMG-20261015-WA0361
Spread the love

 

चामोर्शी : ग्रामीण भागातील संवाद, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीला व्यासपीठ देणाऱ्या ‘पाड्यावरचा चहा’ या उपक्रमाचा शुभारंभ शनिवार 17 ऑक्टोबर 2026 रोजी चामोर्शीत होणार आहे. यानिमित्ताने आयोजकांकडून कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात  करण्यात आले आहे.

घोट–आष्टी रोडवरील हनुमान मंदिर, चामोर्शी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, दुपारी 11वाजता परित्राण पाठ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या शुभारंभ कार्यक्रमाला देवानंद बोरकार सर ,दादाजी काटकर सर आणि प्रदीप तेलसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘पाड्यावरचा चहा’  “TEA स्टॉल “हा केवळ चहाचा कार्यक्रम न राहता, ग्रामीण भागातील नागरिकांना एकत्र आणत संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि सामाजिक विषयांवर चर्चा घडवून आणणारा उपक्रम ठरणार का, याकडे आता चामोर्शीकरांचे लक्ष लागले आहे.

 

स्थळ : हनुमान मंदिर, घोट–आष्टी रोड, चामोर्शी

दिनांक : 17 ऑक्टोबर 2026

वेळ : दुपारी 11 वाजता

प्रो.प्रा- मोनिका भिमटे, स्नेहा मेश्राम, अपेक्षा कातकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!