अतिदुर्गम नेलगुंडा येथील नागरिकांसाठी गडचिरोली पोलीसांनी व ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारला पूल.

0
IMG-20261013-WA0151
Spread the love

IMG 20261013 WA0150

पोस्टे नेलगुंडा पोलीसांकडून राबविण्यात आला समाजाभिमूख उपक्रम

गडचिरोली जिल्ह्रातील नक्षलग्रस्त दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: पावसाळ्याच्या काळात नाले व ओढताना पाणी आल्यामूळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात. अशातच पोस्टे नेलगुंडा हद्दीतील मौजा नेलगुंडा या गावाजवळील नाल्यामूळे वाहतूकीचा मार्ग बंद होत असल्याने पोस्टे नेलगुंडा व एसआरपीएफच्या जवानांनी नागरिकांच्या सुविधेसाठी श्रमदानातून पूलाची उभारणी केली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, पोस्टे नेलगुंडा हद्दीतील मौजा नेलगुंडा गावाजवळ असलेल्या नाल्यामध्ये साठलेल्या पावसाच्या पाण्यामूळे वाहतूकीची समस्या निर्माण होऊन नेहमी इतर गावाशी संपर्क तुटत असतो. तसेच त्या दरम्यान वैद्यकीय मदत आणि शालेय विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. येथील नागरिकांच्या वाहतूकीच्या समस्येवर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक, गडचिरोली  एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक 12 ऑक्टोंबर 2026 रोजी अभियानादरम्यान योग्य बंदोबस्त लाऊन पोस्टे नेलगुंडा पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच एसआरपीएफच्या अंमलदारांनी श्रमदानातून एक नवीन पुुल तयार केला आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे पुलावरुन येणे जाणे सुखकर झाले. तसेच गडचिरोली पोलीसांच्या या समाजभिमुख कार्यामूळे येथील नागरिकांच्या मनात गडचिरोली पोलीस दलाबाबत एक आपुलकीची भावना निर्माण झाली असून पोलीस दल केवळ सुरक्षेसाठीच नव्हे, तर समाजाच्या विकासासाठीही कटिबध्द आहे हे या उपक्रमाव्दारे अधोरेखित झाले आहे.

सदर उपक्रम हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली  एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी  हर्षवर्धन बी. जे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड  हेमंत चांदेवार यांच्या नेतृत्वात सिआरपीएफचे असीस्टंट कमांडंट  कुंभार, पोस्टे नेलगुंडाचे प्रभारी अधिकारी पोउपनि. अजिंक्य इथापे तसेच एसआरपीएफचे पोउपनि. मोराणकर व पोलीस अंमलदारांनी राबविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!