आष्टी रोड अड्याळ जवळ हेल्मेट आणि लायसन्स जनजागृती; कर्तव्यदक्ष पोलिसांकडून वाहनचालकांना नियमांचे धडे

0
IMG-20261006-WA0203
Spread the love

IMG 20261006 WA0200

चामोर्शी/गडचिरोली : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहनचालकांना वाहतूक नियमांचे गांभीर्य पटवून देण्यासाठी आष्टी रोडवरील अड्याळ परिसरात पोलिसांकडून हेल्मेट व वैध वाहन परवान्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालविताना वैध ड्रायव्हिंग लायसन्स जवळ बाळगणे, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे, तसेच स्वतःसह इतरांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारणे, याबाबत पोलिसांनी वाहनचालकांना थेट मार्गदर्शन केले. वाहतूक नियम हे केवळ दंडापासून वाचण्यासाठी नसून, अपघातातील जीवितहानी टाळण्यासाठी आहेत, असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशान्वये तसेच वाहतूक शाखा, गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी शरद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात वाहतूक नियमांबाबत प्रबोधन व जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अड्याळ परिसरात ही मोहीम घेण्यात आली.
यावेळी स. पो. संतोष धोटे, पो. ह. वा. भगवान झोडे, पो. शी. बावणे, पो. शि. मडावी आणि पो. ह. वा. शैलेश मडावी यांनी वाहनचालकांशी संवाद साधत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
हेल्मेट वापरा, लायसन्स जवळ ठेवा आणि नियमांचे पालन करा; कारण काही सेकंदांची बेफिकिरी आयुष्यभराची हानी ठरू शकते, असा धारदार संदेश पोलिसांनी या जनजागृतीतून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!