मोहगाव गोटूल शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप.

0
IMG-20261004-WA0045
Spread the love

 

गोंडवाना अस्मिता बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थी-पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी:
धानोरा : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मोहगाव येथील पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल शाळेत गोंडवाना अस्मिता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विद्यार्थी-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष अशोक मडावी व सदस्य सचिन कीलनाके यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पी.टी. गणवेश, शूज, पेन-पेन्सिल, नोटबुक, विविध गोंडी साहित्यिक पुस्तके तसेच बॅट-बॉल, बॅडमिंटन, वॉलीबॉल व नेट, फुटबॉल आदी साहित्य देण्यात आले.

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आपली भाषा, संस्कृती, परंपरा आणि साहित्याची ओळख व्हावी तसेच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अशोक मडावी, उपाध्यक्ष कपिल कोटनाके, सचिव महेश कंगाले, बाबारावजी पुसाम, हर्षद कोराम, मंगेश शेडमाके, देविदास मडावी, प्रकाश तोफा, संजय गावडे, दीपा उसेंडी, ज्योती उसेंडी, डॉ. गजानन शिंदे, कृष्णा कुलसंगे, देवचंद पदा, लक्ष्मण शेडमाके, गंगाधर कोरे, अमन हिचामी, सरलेश मट्टामी, रवी वडडे, सुप्रीम तेलामी, प्रफुल कोवा, शंकर मसराम, उमेश किरनाके, मंगेश तोडासे, मनोज मडावी, विक्रांत उईके, आकाश सलामे, मोरेश्वर वटटी, दिलीप टेकाम, गजेंद्रसिंह कुरवेती, गुणवंत मडावी, प्रदीप सिडाम, गोविंद मरकाम, सचिन कीलनाके, अतुल मानकर, निखिल उसेंडी, मनीषा चिकराम, डॉ. टेंभुर्णे आदी उपस्थित होते.

तसेच भागातील प्रतिष्ठित नागरिक देवसाय आतला, रामा पाटील पदा, शिक्षिका चंदाताई कोरचा, शिक्षक शेषराव गावडे, शिक्षिका वेडदा, शिक्षक श्रीरामे, परमेश्वर गावडे, अजय पदा, उत्तम आतला, दिनेश टेकाम आदींसह परिसरातील पालक, महिला व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासोबतच गोंडी भाषा-साहित्य, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!