धरणे आंदोलनाला विविध कर्मचारी संघटनांचा जाहीर पाठिंबा

0
IMG-20260929-WA0291
Spread the love

IMG 20260929 WA0290 IMG 20260929 WA0280

गडचिरोली : विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना गडचिरोली, फार्मसी ऑफिसर असोसिएशन गडचिरोली तसेच महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना, शाखा गडचिरोली यांनी जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी औषध निर्माण अधिकारी संघटना, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीनेही आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला. संघटनेचे सचिव श्री. परेश कोल्हे, मुख्य संघटक श्री. विवेक मून तसेच वरिष्ठ सल्लागार श्री. गोपाल मिराणी यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
विविध कर्मचारी व पेन्शनर्स संघटनांनी एकत्रितपणे आंदोलनाला पाठिंबा दिल्याने संबंधित मागण्यांना व्यापक संघटनात्मक पाठबळ मिळत असल्याचे यावेळी दिसून आले. मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!