आष्टीत ट्रक मालकांच्या आंदोलनाला विरोध; चालकांच्या हक्कांसाठी लढा देण्याचे विवेक खोब्रागडे यांचे आवाहन.
Oplus_131072

आष्टी : ट्रक मालकांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी चालकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन करण्याचा प्रयत्न करू नये. चालकांच्या हक्काचा एकही प्रश्न न मांडता केवळ स्वार्थासाठी आंदोलन करण्यास आष्टीत परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा आझाद समाज पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे यांनी दिला.

ट्रक चालकांच्या पगारवाढीसह त्यांच्या हक्कांसाठी, कामाच्या योग्य अटींसाठी आणि सुरक्षिततेसाठी आंदोलन करायचे असेल तर आझाद समाज पार्टीचा त्याला पूर्ण पाठिंबा राहील. मात्र चालकांच्या प्रश्नांचा वापर करून स्वतःचा स्वार्थ साधणारे आंदोलन आम्ही खपवून घेणार नाही.
अहेरी-अल्लापल्ली परिसरात परिस्थिती निर्माण झालेली असताना आष्टीतील शांतता भंग करण्याचा कोणताही प्रयत्न होऊ देणार नाही. नागरिकांची शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी संयम राखावा, असे आवाहनही विवेक खोब्रागडे यांनी केले.
— विवेक खोब्रागडे
युवा जिल्हाध्यक्ष, आझाद समाज पार्टी

