नागपूर चक येथे पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत; तिघांवर हल्ला करून चावा.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

गणेश विसर्जनाच्या वेळी घडली घटना; जखमींना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात उपचार

चामोर्शी : तालुक्यातील नागपूर चक येथे गणेश विसर्जनाचा कार्यक्रम सुरू असताना पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक तिघांवर हल्ला करून चावा घेतल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या हल्ल्यात सचिन पाल (२३), किशोर पाल (२४) आणि शुभम पाल (२०), तिघेही रा. नागपूर चक, हे जखमी झाले. गणेश विसर्जनाच्या कार्यक्रमात नागरिकांची वर्दळ असतानाच कुत्र्याने अचानक हल्ला केल्याने तिघांनाही चावा लागला.

घटनेनंतर जखमींना तातडीने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार करून रेबीज प्रतिबंधक लस दिली. उपचारानंतर तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, नागपूर चक परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आक्रमक व मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!