जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची (BRSP)बैठक.

गडचिरोली : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (BRSP) जिल्हा गडचिरोलीच्या वतीने रविवार, २७ सप्टेंबर रोजी चांदेकर बिल्डिंग, चामोर्शी रोड, गडचिरोली येथील जिल्हा कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला विदर्भाचे अध्यक्ष तथा संयोजक विशेष जी. फुटाणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासह पक्षाचा जनतेशी संपर्क वाढविणे, विविध जनहिताच्या मागण्या घेऊन पक्षाचा अजेंडा पुढे नेणे आणि आगामी काळातील पक्षाची दिशा निश्चित करण्याबाबत बैठकीत सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
यावेळी विदर्भ कमिटीचे सदस्य मिलिंद बांबोडे यांनी प्रास्ताविक केले. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बैठकीला वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. जणबंधू, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम रामटेके, मुस्लिम आघाडीचे जिल्हाध्यक्ष इमरान सय्यद, तालुकाध्यक्ष बांबोडे, शहराध्यक्ष आकाश बांबोडे, पक्षाचे महासचिव अरविंद वाळके, ज्येष्ठ नेते विलासभाऊ कुंभारे, ज्येष्ठ प्रवक्ते राजभाऊ भगत, चंद्रप्रकाश गेडाम, युवा अध्यक्ष वैभव दरडे, तुषारभाऊ रामटेके, बंडूभाऊ वाघमारे, चंद्रकांत रायपुरे, मिथुन गेडाम यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशनात जनसामान्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा
येत्या डिसेंबर महिन्यात नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत जाहीर करण्यात आला. या मोर्चासाठी गडचिरोली जिल्ह्यातून किमान ५०० कार्यकर्ते नागपूरला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीत पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासह जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


