जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवाजी हायस्कूलचा दबदबा; खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड.

0
IMG-20260925-WA0139
Spread the love

 

चामोर्शी | प्रतिनिधी
चामोर्शी येथील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या कुस्तीपटूंनी जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर शाळेच्या कुस्तीपटूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळाडूंनी ताकद, डावपेच, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. नियमित सराव, शिस्तबद्ध तयारी आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे खेळाडूंना प्रतिस्पर्ध्यांवर मात करत जिल्हास्तरावर आपला ठसा उमटविता आला.
शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रालाही शाळेकडून प्रोत्साहन दिले जात असून, त्यातूनच कुस्तीपटूंनी हे यश मिळविल्याचे सांगण्यात आले. क्रीडा शिक्षक राकेश खेवले, प्राचार्य धिरेंद्र चौधरी आणि उपप्राचार्य शाम भर्रे यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच पालकांच्या प्रोत्साहनामुळे हे यश शक्य झाल्याचे खेळाडूंनी सांगितले.
शिवाजी हायस्कूलच्या कुस्तीपटूंची विभागीय स्तरावर निवड झाल्याने चामोर्शीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. या खेळाडूंकडून विभागीय स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत असून, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!