जिल्हा परिषद गडचिरोली येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी.
प्रेस नोट

गडचिरोली 25:-
जिल्हा परिषद गडचिरोली येथे थोर विचारवंत, एकात्म मानवदर्शन व अंत्योदय संकल्पनेचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती मोठ्या उत्साहात व आदराने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवणे आणि ‘अंत्योदय’ तत्त्वाचा अंगीकार करून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी . राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी . अनिकेत पाटील, प्रकल्प संचालक काळभोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, महिला व बाल कल्याण अधिकारी . दीपक बानाईत तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी . पंकज भोयर, समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे इतर विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

