भेंडाळा वितरण कार्यालयाजवळ काळी-पिवळीला कारची जोरदार धडक; चालकासह प्रवासी गंभीर जखमी.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

चामोर्शी | भेंडाळा, दि. १० सप्टेंबर :
प्रवासी घेऊन मुलकडे जाणाऱ्या काळी-पिवळी वाहनाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी (१० सप्टेंबर) दुपारच्या सुमारास भेंडाळा येथील महावितरण कार्यालयाजवळ घडली. या अपघातात काळी-पिवळी चालकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून, वाहनातील एका प्रवाशालाही गंभीर मार लागल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काळी-पिवळी वाहन प्रवाशांना घेऊन मुलच्या दिशेने जात होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या कारने काळी-पिवळीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, काळी-पिवळी चालकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली, तर एका प्रवाशालाही शरीरावर गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.
दरम्यान, घटनेबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता अपघातासंदर्भात अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महावितरण कार्यालयाजवळ झालेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणेने चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!