Learning Links Foundationच्या कार्याची दखल; जिल्हा व्यवस्थापक उज्वल गोरे यांचा शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते सन्मान.

0
IMG-20260910-WA0252
Spread the love

 

Learning Links Foundation–NPCIच्या School Transformation Project अंतर्गत जिल्ह्यातील २१५ शाळांमध्ये विविध सुविधा

गडचिरोली : Learning Links Foundation (LLF) आणि National Payments Corporation of India (NPCI) यांच्या सहकार्याने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या School Transformation Project अंतर्गत शाळांच्या शैक्षणिक व पायाभूत विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली. या कार्याबद्दल Learning Links Foundationचे जिल्हा व्यवस्थापक उज्वल गोरे यांचा राज्याचे शिक्षणमंत्री मा. दादाजी भुसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
डिसेंबर २०२१ मध्ये गडचिरोली आणि वाशीम जिल्ह्यात प्रत्येकी २५ शाळांपासून या प्रकल्पाची सुरुवात झाली. शाळा, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यामुळे प्रकल्पाचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला. सध्या गडचिरोली जिल्ह्यातील २१५, तर वाशीम जिल्ह्यातील १९५, अशा एकूण ४१० शाळांमध्ये हा प्रकल्प पोहोचला असून गडचिरोलीत Phase 7चे काम सुरू आहे.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आधुनिक, सुरक्षित, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे. त्याअंतर्गत शाळांमध्ये Smart Boards, Digital Learning Content, Science Labs, Libraries, RO Water Systems, Sports Kits, Maths Kits, Health & Hygiene Kits, Toilet Renovation, BaLA, Solar Systems तसेच Facade Painting यांसारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
केवळ पायाभूत सुविधा उपलब्ध करून न थांबता त्यांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रभावी वापर व्हावा, यासाठी LLFच्या माध्यमातून Teacher Training, SMC Training, Student Wellness Sessions आणि Summer Camps यांसारखे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांचे आरोग्य, आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला जात आहे.
गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक जिल्ह्यातील शाळांपर्यंत आधुनिक शैक्षणिक सुविधा पोहोचविण्यासाठी Learning Links Foundationची टीम सातत्याने कार्यरत आहे. या उपक्रमाला जिल्हा परिषद प्रशासन, शिक्षण विभाग, मुख्याध्यापक, शिक्षक, SMC सदस्य, पालक आणि शाळा समुदायाचे सहकार्य लाभत आहे. तसेच NPCIच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळे प्रकल्पाच्या विस्ताराला महत्त्वपूर्ण चालना मिळाली आहे.
उज्वल गोरे यांचा शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते झालेला सन्मान हा त्यांच्या वैयक्तिक कार्यासोबतच Learning Links Foundationच्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नांचा गौरव मानला जात आहे. या सन्मानाबद्दल जिल्हा परिषद प्रशासन, शिक्षण विभाग आणि LLFच्या सहकाऱ्यांकडून गोरे यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी राकेश लोनारकर, अश्विन कोपुलवार तसेच Learning Links Foundationची टीम उपस्थित होती. उपस्थित मान्यवरांनी जिल्ह्यातील शाळांच्या शैक्षणिक व पायाभूत विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!