चामोर्शीत गणेशोत्सव पूर्वतयारी बैठक; मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

चामोर्शी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चामोर्शी पोलीस ठाण्याच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. रमेश (भा.पो.से.) यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १४ सप्टेंबर २०२६ पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.
मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता गडचिरोली रोडवरील बालाजी मंगल कार्यालय, चामोर्शी येथे ही बैठक होणार आहे. चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांचे अध्यक्ष, सचिव, आयोजक, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, शांतता समिती व मोहल्ला समितीचे पदाधिकारी तसेच अन्य मान्यवरांनी बैठकीस प्राधान्याने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीत गणेशोत्सवातील मिरवणुका, कायदा-सुव्यवस्था, पर्यावरणपूरक उत्सव आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच गणेश मंडळांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचा समावेश करण्यात येऊ नये, अशी सूचना पोलीस प्रशासनाने केली आहे.
“शांतता, सहकार्य आणि सुरक्षित गणेशोत्सवासाठी सर्वांनी एकत्र येऊया, मिरवणुकीची परंपरा जपूया, कायदे पाळूया आणि पर्यावरणाचे संरक्षण करूया,” असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
बैठकीचे आयोजन पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, पोलीस स्टेशन चामोर्शी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!