दोन वेगवेगळ्या ऑनलाईन फसवणूकीच्या गुन्ह्रातील आरोपींना गडचिरोली पोलीस दलाने केली अटक.

0
IMG-20261013-WA0131
Spread the love

                                 प्रेस नोट

 

IMG 20261013 WA0130

* म्युल अकाऊंटच्या माध्यमातून 01 कोटीहून अधिक रक्कमेची फसवणूक करणा­या दोन्ही आरोपींना अटक

* सोशल मीडियावर बेडशीट विक्रीच्या बनावट जाहिराती देऊन फसवणूक करणा­या आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे माग काढून अटक

* आपली बँक खाती, सिमकार्ड व कागदपत्रे इतरांच्या वापरासाठी देऊ नका – गडचिरोली पोलीस दलाचे आवाहन

गडचिरोली:-१३ ऑक्टोबर २०२६

सध्या सोशल मीडियावरील बनावट जाहिराती तसेच इतरांच्या नावे बँक खाती उघडून त्याद्वारे होणा­या आर्थिक फसवणूकीचे प्रमाण वाढत आहे. अशा सायबर गुन्ह्यांचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक, गडचिरोली  एम. रमेश यांनी दिलेले आहेत. त्याअनुषंगाने पोलीस स्टेशन गडचिरोली येथे दाखल दोन वेगवेगळ्या ऑनलाईन फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये गडचिरोली पोलीसांनी प्रभावी कारवाई केली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, गडचिरोली येथे शिक्षण घेणा­या एका 25 वर्षीय युवतीची दिनांक 04 जून 2026 रोजी केदारनाथ येथील सहलीदरम्यान गडचिरोली येथील एका 22 वर्षीय युवतीशी ओळख झाली. पुढे त्यांची मैत्री होऊन फिर्यादीने तिची ओळख आपल्या सहा मैत्रिणींशी करून दिली. दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी सदर युवतीने आपले बँक खाते होल्ड झाल्याचे सांगून ट्रेडिंग करण्याकरिता सर्व मैत्रिणींच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते उघडून देण्याची विनंती केली. विश्वास ठेवून मैत्रिणी तयार झाल्यानंतर ऑगस्ट 2026 मध्ये तिने त्यांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावे नवीन सिमकार्ड खरेदी केले, त्यांच्या नावे बँक खाती उघडून तीने सिमकार्ड खात्यांशी लिंक केला आणि खात्यांचे पासबुक, एटीएम कार्ड व सिमकार्ड स्वतःसोबत घेऊन गेली. यानंतर दिनांक 06 ऑक्टोंबर 2026 रोजी फिर्यादीच्या घरी बँकेकडून तिच्या खात्यात मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याबाबतची नोटीस आली. सर्व मैत्रिणींनी बँकेत जाऊन खात्यांची पडताळणी केली असता, सातही खात्यांमध्ये मिळून सुमारे 01 कोटी 04 लाख रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले.

आपल्या परवानगीशिवाय खात्यांचा वापर करून विश्वासघात व फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादीने दिनांक 09 ऑक्टोंबर 2026 रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अप क्र. 1513/2026 कलम 316 (2), 318 (4) भा.न्या.सं. 2023 अन्वये सदर युवतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्राचे गांभिर्य लक्षात घेऊन मा. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवून आरोपी जुही विनायक मेश्राम, वय 23 वर्षे, रा. आशिर्वाद नगर, गडचिरोली हिस मोठ¬ा शिताफिने ताब्यात घेऊन तिच्याकडे सदरबाबत अधिक विचारपूस केली असता, पुणे येथील तिचा मित्र नामे सात्विक दिपक सावडिया, वय 22 वर्षे, रा. सुभाष चौक, रायगड, जि. रायगड (छ.ग.) याने तिला ट्रेडींगकरीता सात बँक खाती मिळविण्यास सांगितले असता तिने गडचिरोली येथील 07 मुलींना खोटे सांगून महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा गडचिरोली येथे खाते काढून सदर सातही बँकेचे पासबुक, एटीएम, पीन, पासवर्ड हे आरोपी मित्र सात्विक यास दिल्याचे सांगितले. यानंतर सदर माहितीच्या आधारे शोध घेऊन सात्विक सावडीया यास पोलीसांनी दिनांक 10 ऑक्टोंबर 2026 रोजी ताब्यात घेतले. यानंतर आरोपी क्र. 1) जुही विनायक मेश्राम, वय 23 वर्षे, रा. आशिर्वाद नगर, गडचिरोली व 2) सात्विक दिपक सावडिया, वय 22 वर्षे, रा. सुभाष चौक, रायगड, जि. रायगड (छ.ग.) यांना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यांना 05 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम कोठून आली व पुढे कुठे वर्ग झाली, याबाबत सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोनि. विनोद चव्हाण, पोस्टे गडचिरोली हे करीत आहेत.

यासोबतच दुस­या प्रकरणात, दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी फिर्यादीने फेसबुकवर ‘Sajja Handloom’ नावाची बेडशीट विक्रीची जाहिरात पाहून व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला व एका बेडशीटसाठी 550/- रुपये ऑनलाईन पाठविले. त्यानंतर दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी ‘PP Collection AC Comfuter set Bedsheets’ या नावाची आणखी एक जाहिरात पाहून तीन बेडशीटसाठी 1,000/- रुपये पाठविले. अशा प्रकारे एकूण 1,550/- रुपये पाठवूनही ऑर्डर केलेला माल प्राप्त झाला नाही. संबंधित दुकानाच्या मूळ मालकाशी संपर्क केला असता त्यांच्या दुकानाच्या नावाचा वापर करून अज्ञात व्यक्ती ऑनलाईन फसवणूक करीत असल्याचे समोर आले.

याबाबत पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अप क्र. 1192/2026, कलम 318 (4), 319 (2) भा.न्या.सं. 2023 सहकलम 66 (सी) (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. यानंतर पोलीसांना तपासादरम्यान तांत्रिक पुराव्यांचे सखोल विश्लेषण करून आरोपी राजस्थान राज्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गडचिरोली पोलीसांचे पथक राजस्थान येथे रवाना होऊन स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपी साहिल जमशेद उर्फ साहिल जमशेद खान, वय 25 वर्ष, रा. सोमका, तह. पहाडी, जि. डीग (राजस्थान) यास दिनांक 10/10/2026 रोजी मोठ्या शिताफिने अटक करण्यात आली. सक्षम न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड प्राप्त करून आरोपीस दिनांक 12 ऑक्टोंबर 2026 रोजी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे आणण्यात आले आहे. आरोपीने आणखी किती नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक केली, फसवणूकीची रक्कम कोणत्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली, तसेच गुन्ह्यात वापरलेली फेसबुक खाती, मोबाईल, सिमकार्ड व या नेटवर्कमधील इतर साथीदारांबाबत पुढील तपास पोउपनि. प्रविण बंुदे, पोस्टे गडचिरोली हे करीत आहे.

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दि. 01 ते 31 ऑक्टोबरदरम्यान सायबर सुरक्षा जनजागृती महिना राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सायबर गुन्हे व ऑनलाइन फसवणुकीबाबत जागरुकता निर्माण केली जात आहे. याच जनजागृतीमुळे जागरुक झालेल्या नागरिकांनी सायबर फसवण्ुकीसंदर्भात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या. सदर तक्रारींची गांभीर्याने दखल घेत गडचिरोली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. गडचिरोली पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सोशल मीडियावर अतिशय कमी किमतीत वस्तू विक्रीच्या जाहिराती पाहून अनोळखी व्यक्तीच्या यूपीआय आयडी किंवा बँक खात्यावर पैसे पाठवू नयेत; खरेदीपूर्वी विक्रेत्याची विश्वासार्हता पडताळून घ्यावी. तसेच ओळखीच्या किंवा मित्र-मैत्रिणींच्या सांगण्यावरूनही आपल्या नावे बँक खाते उघडून देऊ नये आणि आपले बँक खाते, एटीएम कार्ड, पासबुक, सिमकार्ड व वैयक्तिक कागदपत्रे इतर कोणाच्याही वापरासाठी देऊ नयेत. अशा खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यांमध्ये होत असून त्याची कायदेशीर जबाबदारी खातेधारकावरही येऊ शकते. ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली  एम. रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक  कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक  गोकुल राज जी., सहा. पोलीस अधीक्षक . अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गडचिरोलीचे पोनि. विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!