पुणे येथे आयोजित 21 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलाच्या बीडीडीएस पथकाने पटकावली पदके.

0
IMG-20261012-WA0187
Spread the love

 

* घातपात विरोधी तपासणी या स्पर्धेमधील ग्राउंड सर्च व रुम सर्च या दोन्ही उप-प्रकारात पटकावली ब्रााँझ पदके

* गडचिराली परिक्षेत्राला घातपातविरोधी तपासणीमध्ये तीसरा क्रमांक ; अखील भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्या करीता निवड

IMG 20261012 WA0188

पोलीसांनी व्यावसायिक नैपुण्य, गुणवत्ता कौशल्य, कार्यक्षमता व दर्जा वाढविणे हा मेळाव्या मागील उद्देश असून, राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. या अनुषंगाने दिनांक 05 ते 10 ऑक्टोंबर 2026 या कालावधीत पुणे येथील 21 वे राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये गडचिरोली पोलीस दलातील बीडीडीएस पथकासह एकूण 26 वेगवेगळ्या विभागांनी आपला सहभाग नोंदविला होता. पुणे येथे आयोजीत 21 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सायंटिफिक एड टु इन्वेस्टीगेशन, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडीओग्राफी, कम्प्युटर अवेअरनेस, अॅन्टी सॅबोटेज चेक, श्वान पथक इ. स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धेमध्ये लेखी, तोंडी परीक्षेबरोबरच प्रात्यक्षिक परीक्षाही घेण्यात आले असून, वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत परीक्षण करण्यात आले.

IMG 20261012 WA0186

यामध्ये घातपात विरोधी तपासणी या स्पर्धेमध्ये गडचिरोली पोलीस दलातर्फे बीडीडीएस मधील पोहवा/2489 पंकज हुलके व पोअं/9393 धम्मदिप मेश्राम यांनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेतील ग्राउंड सर्च व रुम सर्च या दोन्ही उप-प्रकारात गडचिरोली पोलीस दलाचे बीडीडीएस पथकाला दोन ब्रााँझ पदके प्राप्त झालेली आहे. यासोबतच सहा दिवस चाललेल्या विविध स्पर्धेमध्ये गडचिराली परिक्षेत्राला घातपातविरोधी तपासणीमध्ये तीसरा क्रमांक प्राप्त झालेला असून सदर टीमची अखील भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याकरीता निवड झालेली आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविलेले बीडीडीएस शाखेतील पोहवा/2489 पंकज हुलके व पोअं/9393 धम्मदिप मेश्राम यांचे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी कौतुक करत भविष्यात अशीच कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!