चरविदंड ग्रामसभेतील अनियमिततेची चौकशी रखडली; सात दिवसांत फेरचौकशीची मागणी.

0
IMG-20261001-WA0346
Spread the love

 

४५ दिवस उलटूनही चौकशी रखडली; सात दिवसांत संपूर्ण गावासमोर चौकशी ची मागणी.

कुरखेडा : गट ग्रामपंचायत चरविदंड अंतर्गत सात गावांची दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेतील अनियमिततेप्रकरणी चौकशी अद्याप झालेली नसल्याने तात्काळ फेरचौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात आझाद समाज पार्टीचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष चेतन काटेंगे तथा चरविदंड येथील ग्रामस्थांनी दि. १ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कुरखेड्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यापूर्वी दि. १९ ऑगस्ट रोजी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता.
कार्यालयीन पत्रानुसार दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी चौकशी निश्चित करण्यात आली होती. मात्र संबंधित अधिकारी गैरहजर राहिल्याने चौकशी होऊ शकली नाही, असे पंचायत समिती कार्यालयाकडून लेखी कळविण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतरही दि. १ ऑक्टोबरपर्यंत चौकशी न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सदर प्रकरणाची पुढील सात दिवसांत सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत फेरचौकशी करून संबंधित बाबींची निष्पक्ष तपासणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देताना अंकुश कोकोडे, जिल्हा उपाध्यक्ष ,जिल्हा महासचिव; चेतन काटेंगे, मंगेश बनसोड, वडसा तालुका उपाध्यक्ष, आझाद समाज पार्टी तसेच चरविदंड येथील नागरिक उपस्थित होते.
या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, नागपूर विभाग; जिल्हाधिकारी गडचिरोली; मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांना माहितीसाठी व योग्य कार्यवाहीसाठी देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!