यशोधरा विद्यालयात आपती व्यवस्थापन शिबीर.

0
IMG-20260929-WA0220
Spread the love

 

चामोर्शी : यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे आपत्ती व्यवस्थापन व पूर्वतयारी शिबीराचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य शाम रामटेके , प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपती व्यवस्थापन विभागाचे प्रशिक्षक नितीन कावडकर , प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रेमानंद वालदे होते.
मार्गदर्शन करताना नितीन कावडकर यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती म्हणजे काय , त्या किती प्रकारच्या असतात , त्याचे व्यवस्थापन कसे करावे , एखादी व्यक्ती बेशुद्ध पडल्यावर काय करावे , महापुराचा सामना कसा करावा. याबाबत विस्तृत विवेचन केले. तसेच विषारी व बिनविषारी साप कसे ओळखावे . साप चावल्यावर प्रथमोपचार काय व कसे करावे याबाबतही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाम रामटेके म्हणाले, आपती व्यवस्थापनाबाबत मिळालेल्या माहितीचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जीवनात वापर करून आपल्यासोबतच इतरांचे जीवन सुखकर होण्यासाठी प्रयत्न करावे.
कार्यक्रमाचे संचलन प्रा. प्रविण गव्हारे यांनी तर आभार प्रदिप भांडेकर यांनी केले. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!