गडचिरोली तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी पूर्ण करावी.

0
Spread the love

 

धान्याचा लाभ नियमित मिळण्यासाठी रास्त भाव दुकानात प्रक्रिया करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

 

गडचिरोली : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा तसेच शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी, यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबातील पात्र सदस्यांची ई-केवायसी येत्या १५ दिवसांत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सागर कांबळे यांनी केले आहे.
ई-केवायसीची प्रक्रिया संबंधित रास्त भाव दुकानात ई-पॉस यंत्राद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने करण्यात येत आहे. लाभार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रास्त भाव दुकानदारांनी आवश्यक सहकार्य करावे आणि ई-केवायसी वेळेत पूर्ण करून घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
ई-केवायसी प्रलंबित राहिल्यास पुढील महिन्यापासून धान्य मिळण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी विलंब न करता संबंधित रास्त भाव दुकानात जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा लाभ नियमितपणे सुरू ठेवावा, असे तहसीलदार कांबळे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!