कारमेल स्कूलमध्ये मधमाशांचा अचानक हल्ला; विद्यार्थी व शिक्षकांना दंश, सरकारी रुग्णालयात उपचार.

0
IMG-20260924-WA0074
Spread the love

 

चामोर्शी : कारमेल स्कूल परिसरात आज अचानक मधमाशांनी आक्रमण केल्याने विद्यार्थी व शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली. मधमाशांच्या हल्ल्यात काही विद्यार्थी व शिक्षकांना चावा लागल्याची माहिती आहे.
घटनेनंतर शाळा प्रशासनाने तत्काळ खबरदारी घेत बाधित विद्यार्थी व शिक्षकांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात हलविले. रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही काळ शाळेच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून सध्या परिस्थिती आटोक्यात असल्याची माहिती मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!